Monday, 8 August 2016



मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा

हल्ली मोबाईलमध्ये चांगल्या प्रतीचे कॅमेरे असतात. तरीसुद्धा अनेक जणांना चांगले फोटो काढता येत नाहीत. फक्त शार्प व क्लिअर फोटो म्हणजे चांगला फोटो असे नव्हे. 

त्यासाठी फोटोग्राफीतील महत्त्वाच्या संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे. उदा. एक्स्पोजर, फोकसिंग, वाईड अंगल लेन्स, टेलिफोटो लेन्स, झूम लेन्स, फोरग्राउंड, बँकग्राउंड, काम्पोझिशन, कलर कॉम्बीनेशन या गोष्टी माहिती असतील तर मोबाईल वापरून उत्कृष्ठ फोटो काढणे शक्य आहे.

मोबाईल कॅमेऱ्यामध्ये विविध कंट्रोल व सेटिंग असतात. अनेक जणांना याचे ज्ञान नसते. त्यामुळे सेटिंग वापरता येत नाहीत.

अनेक मोबाईलमध्ये फोटो एडिट करता येतात, म्हणजेच फोटोत हवे तसे बदल करता येतात. हे बदल का व कसे करायचे हे समजणे आवश्यक आहे. फोटो एडिट करून त्यात खूप सुधारणा करता येतात.

आपली ‘मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा’, वरील गोष्टीवर आधारित आहे. कार्यशाळेत या शिकविल्या जातात. तसेच प्रक्टिकल नॉलेज दिले जाते. त्यामुळे मोबाईल वापरून उत्तम फोटो काढणे सहज शक्य होते.

* * * * *

आपली ‘मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा’, डॉ. आशिष गुरव व श्री. श्रेयस गुरव हे स्वतः आयोजित करतात. ते गेली २५ वर्षे फोटोग्राफी करीत आहेत. त्याच्या या अनुभवातून सदर कार्यशाळेची रचना केली आहे.

त्यांचे फोटो पहा www.flickr.com/photos/ashish

* * * * *

कार्यशाळा - रविवार दि. १४ ऑगस्ट २०१६, स. ९.३० ते २ 

पत्ता - रायझिंग स्टार्स इंटरनशनल स्कूल, रचनाकार हौसिंग सोसायटी, देवकर पाणंद रोड, तपोवन ग्राउंडच्या पश्चिमेस, कोल्हापूर.

नोंदणी फी - रु. ५००/- (पहिल्या २० जणांसाठी रु. ४००/-)

No comments:

Post a Comment